*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि. अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे हस्तकला शिक्षक श्री.कळंबे.एस.एस. यांच्या हस्ते करून जयंती  साजरी करण्यात आली. वि.शिक्षक श्री. मोरे आर. सी.यांनी माहिती दिली.त्या निमित्त मुलांना खाऊ व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या. विद्यालय मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.*