*श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि.अहिल्यानगर येथे आज शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे संस्थापक नांदुर्खी बु. गावचे सरपंच मा.श्री माधवराव चौधरी सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन शिक्षक दिनानिमित्त करण्यात आले . याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संस्था व विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानीत करण्यात आले.या वेळी वि.शिक्षक श्री सोळसे बी.बी व श्री मडके जी.डी.यांनी माहिती दिली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभलेले मा.श्री माधवराव चौधरी सर यांनी शिक्षकामुळे चांगला समाज घडत असतो .शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला. शिक्षक हा देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जावु शकतो,हे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री कासार बी.आर.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.*
0 Comments