*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि. अहिल्यानगर येथे आज-गुरुवार दि- 2 ऑक्टोबर 2025 रोजी  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली .विजयादशमी ( दसरा) निमित्त  विद्यालयातील शैक्षणिक साहित्याची पूजा करण्यात आली व  स्वच्छता अभियान राबविण्यात आले .या कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.*