*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता.राहाता जि. अहिल्यानगर येथे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम सत्रातील पालक मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
पाहुण्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापक श्री.कासार सरांनी प्रास्ताविकात  विद्यालयात दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व विविध घेण्यात येणाऱ्या स्पर्धा तसेच मुलांचे संगोपन कसे केले जाते या बद्दल सविस्तर माहिती सांगितली.मुलांना व पालकांना दिपावली निमित्त मिठाईचे वाटप करून पालक मेळावा संपन्न झाला.  या कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या. मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.*
0 Comments