*श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय,निवासी(पिंपळवाडी रोड) शिर्डी.ता. राहाता जि. अहिल्यानगर चे संस्थापक तसेच नांदूर्खी बु. चे लोकनियुक्त सरपंच, माधवराव चौधरी सर यांच्या मार्गदर्शनातून स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.नांदूर्खी बु.जि.प.प्राथ.शाळा व चौधरी वस्ती जि. प.प्राथ.शाळा येथील साधारण १०० ते ११० विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शिक्षकवृंद यांनी मंगळवार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय, पिंपळवाडी रोड,शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली.प्रसंगी*
*१)जि.प.प्राथ.शाळा नांदूर्खी बु व चौधरी वस्ती विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी वृंद-नांदूर्खी बु.*
*२)अंगणवाडी सेविका,मदतनीस-नांदूर्खी बु.*
*३)आशा सेविका,नांदूर्खी बु.*
*४)महिला बचत गटातील सर्व पदाधिकारी व सदस्या,नांदूर्खी बु.*
*५)ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद नांदूर्खी बु.*
*६)वि.वि.कार्य.सह.सोसायटी कर्मचारी वृंद,नांदूर्खी बु.*
*७)सोशल मिडीया व पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.*
*वरील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचा स्वागत व सत्कार सोहळा व जि.प.प्राथ.शाळा नांदूर्खी बु. विद्यार्थी -विद्यार्थीनींना वही,पेन,(शार्पनर,पट्टी,शिसपेन्सिल,खोडरबर,वॉटर बॉटल) असे एकत्रित शैक्षणिक किट साहित्य वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचारी वृंद यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.यावेळी श्री गणरायाची सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.*                                                                             *यावेळी विद्यालय संस्थापक तसेच नांदूर्खी बु.चे लोकनियुक्त सरपंच, माधवराव चौधरी सर, ग्रामविकास अधिकारी गहिनीनाथ कोते,किरण चौधरी माजी उपसरपंच, संजय चौधरी, दिपक चौधरी, बापूराव दाभाडे, रविंद्र चौधरी, आप्पासाहेब दाभाडे, अवधूत काळे, नानासाहेब चौधरी, कलापुरे सर, वाणी सर, प्रमोद चौधरी यांजबरोबर जि.प.प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आशा खेडेकर, सौ. सुलोचना भोर,चौधरी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक राजेश सरोदे सर, श्री रामदास कावरे सर, गायकवाड मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. सुनिता वाणी, सुनिता चौधरी, वैशाली दाभाडे, योगिता चौधरी, अनिता शिंदे, सुनिता कोळगे, रंजना दाभाडे, पुनम देवकर, शोभा गायकवाड, आशा सेविका सौ. सरला मोकळ,अर्चना सुपेकर,ग्रामपंचायत कर्मचारी योगेश गोसावी, अर्जुन आरणे आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित जि. प. शाळा विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. ही चिमूकले मुक बधिर मुलांना पाहून गहिवरले,भावुक झाले. परंतु शैक्षणिक साहित्य किट मिळताच आनंदले. मुक बधिर मुलांना शिकवणे-समजावणे अतिशय जीकरीचे व जबाबदारीचे काम असल्याचे मत राजेश सरोदे सरांनी व्यक्त केले तर मुक बधिरांना खरी मायेची पाखर चौधरी सर व कुटुंबीय देत असल्याचे वक्तव्य आशा खेडेकर मॅडम यांनी केले.
यावेळी  विद्यालय मुख्याध्यापक बाळासाहेब कासार सर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुक बधिर विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी श्री सत्यनारायण महाप्रसादाचा आनंद घेतला.*