*आज वार-शनिवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी, ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे  श्री माधवराव चौधरी संस्थापक श्री साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय शिर्डी तथा लोकनियुक्त सरपंच नांदूर्खी  बु.यांचे मार्गदर्शनातून "रक्षाबंधन उत्सव"साजरा करण्यात आला.रक्षाबंधन सणा निमित्त मुलांना बहिण भावाच्या नात्या बद्दल माहिती देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी मुलांना राख्या बांधल्या. तसेच पेढे भरवुन विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला . वसतिगृहातील कर्णबधिर मुलांना राखी बांधल्यामुळे सर्व मुलींना खुप समाधान वाटले.या वेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी वृंद  उपस्थित होते.*