*श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी येथे शनिवार दिनांक 16ऑगस्ट 2025 रोजी 'गोपाळकाला' निमित्त दहीहंडीचा उत्सव विद्यालय संस्थापक, नांदुर्खी बु. चे लोकनियुक्त सरपंच श्री माधवराव चौधरी सर यांच्या संकल्पनेतुन जल्लोषात साजरा करण्यात आला.तसेच महिला मंडळ सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या.'मच गया शोर सारी नगरी रे......' च्या तालावर सर्व मुक-बधिर विद्यार्थी थिरकले. श्रीकृष्णाची व राधाची भूमिका देऊन इतर बाल गोपाळांना सोबत घेऊन दहीहंडी फोडण्यात आली.प्रसंगी विद्यालय मुख्याध्यापक श्री कासार बी.आर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.*
0 Comments