*श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित ,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा विद्यालय संस्थापक सन्माननीय माधवराव चौधरी सर लोकनियुक्त सरपंच नांदुर्खी बु. यांचे मार्गदर्शना खाली उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यालयातील ध्वजारोहण फिनोलेक्स कंपनीचे डिलर सन्माननीय श्री प्रशांत राजेंद्र पा.बावके,साकुरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणार नाही करू देणार नाही अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फिनोलेक्स कंपनीचे डिलर श्री.तुषारभाऊ अरुण वावरे,शिर्डी हे उपस्थित होते. पाहुण्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली." हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या माध्यमातून दि. 13, 14, 15 ऑगस्ट या तीनही दिवशी कवायत संचलन सराव, चित्रकला व रांगोळी स्पर्धा पसायदानाचे सामुदायिक गायण आदी कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिन उत्सवाचे वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितावर आधारित डंबेल्स,कवायत, तालबद्ध कवायतीचे सादरीकरण करण्यात आले. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री जालिंदर चासकर यांनी " देश मेरा रंगीला " या देशभक्तीपर गीतावर मुक-बधिर मुलांचे सुंदर समूहनृत्य सादर केले. वर्षभरात विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते कौतुक करण्यात आले. यावेळी राजेंद्र गोंदकर,सुनिल कोल्हे, विलासराव औताडे,अभिषेक चौधरी,साईनाथ भाऊ गोंदकर, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालय मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच सूत्रसंचालन वि. शिक्षक श्री सोळसे बी. बी.तर आभार श्री पाटील वाय.ए.यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.*