*आज वार-शुक्रवार दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय निवासी शिर्डी, ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी यांचे वतीने "रक्षाबंधन उत्सव"साजरा करण्यात आला. संजीवनी स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या आणून कर्णबधिर मुलांना बांधल्या. तसेच मिठाईचे वाटप केले. वसतिगृहातील कर्णबधिर मुलांना राखी बांधल्यामुळे सर्व मुलींना खुप समाधान वाटले. यावेळी संजीवनी स्कूल चे योगेश गायकवाड सर व इतर कर्मचारी तसेच विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.*