आज गुरुवार दि.01 मे 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी )शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. शिर्डी नगर परिषदेचे सफाई कामगार जे विद्यालयाला नेहमी सेवा देतात त्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 Comments