आज बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी)शिर्डी ता.राहाता जि.अहिल्यानगर येथे *यशवंतराव चव्हाण* यांची जयंती साजरी करण्यात आली. वि. शिक्षक श्री ढवळे सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्री कळंबे एस.एस यांनी माहिती दिली.
तसेच विद्यालयामध्ये शिर्डी नगरपरिषद शिर्डी आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा मा .श्री जगन्नाथ थोरात साहेब अग्निशमन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक किंवा मानव प्रेरित आपत्ती पासून मानवी जीवनाच्या सुरक्षेसाठी मालमत्तेचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उपाय योजना या विषयी मार्गदर्शन व आग विझवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले. प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस श्रीमती वैशालीताई चौधरी मॅडम मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब कासार सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments