*दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी मध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा समाज कल्याण विभाग,जि.प. अहिल्यानगर व जिल्हा पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर आयोजित 'सुगम्य यात्रा 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.*                          *सुगम्य यात्रा कार्यक्रमांमध्ये सद्यस्थितीत प्रचलित असलेल्या सुगम्यतेच्या नियमावलीच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना त्यांचे शहरातील शासकीय इमारती,नगरपालिका, महानगरपालिका इमारती,सिनेमागृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे,ग्रंथालय, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील दिव्यांगांना सुगम्यते विषयी येणाऱ्या अडचणी बाबत प्राथमिक स्तरावर माहिती करून घेणे व माहितीचा समावेश हा शहरी धोरणांमध्ये शहराचा आराखडा तयार करताना आणि विकासात्मक धोरणामध्ये करण्यासाठी प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना व नियोजकांना सादर करणे आदी बाबींचा समावेश आहे.                  या अनुषंगाने आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी या धार्मिक तसेच साईतीर्थ थीम पार्क,शिर्डी या प्रेक्षणीय स्थळास मा. श्रीमती एल.अनुपमा,सहाय्यक प्राध्यापक (स्पीच अँड हिअरिंग)सी. आर.सी.नागपूर तसेच  मा.श्री. देविदास कोकाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.*             *सदर ठिकाणी दिव्यांगांसाठी आवश्यक त्या सर्व सुख-सुविधा आढळून आल्या. दिव्यांग सुगम्यतेच्या दृष्टीने कोणत्याही अडचणी आढळून आल्या नाहीत.यावेळी काही दिव्यांगांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर ठिकाणे अडथळा विरहित असल्याचे लक्षात घेण्यात आले.*                *प्रसंगी श्री प्रदीप जगताप कनिष्ठ अभियंता पंचायत समिती बांधकाम विभाग,राहाता श्री माधवराव चौधरी सर संस्थापक,श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय, शिर्डी,श्री सचिन तरवडे संस्थापक मतिमंद मुलांचे बालगृह,पाथर्डी, श्री कैलास यादगुडे अध्यक्ष-प्रहार दिव्यांग  क्रांती    संघटना ,शिर्डी,श्री गिज्ञानदेव जाधव सर, श्री बाळासाहेब कासार सर. श्री नासीर देशमुख सर,मुक बधिर विद्यालय  व मतिमंद विद्यालय शिक्षक कर्मचारी वृंद व इतर दिव्यांग बांधव आदी उपस्थित होते.*