आज बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार सर यांच्या शुभहस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच महाराष्ट्र राज्य गीत घेऊन या जयंती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वि.शिक्षक श्री नवनाथ ढवळे सर यांनी मुलांना छत्रपतींच्या जीवनावरील माहिती दिली. याप्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.सर्व मुलांना जयंतीनिमित्त चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.