*दिव्यांगांना घडविणे दिव्य व आव्हानात्मक काम असल्याचे मनोगत राहाता ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी माननीय तायडे यांनी व्यक्त केले.**श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा.देविदास कोकाटे साहेब तसेच विद्यालय संस्थापक श्री माधवराव चौधरी सर यांचे मार्गदर्शनातून विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.यावेळी मुकबधिर मुलांच्या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विद्यालयात पार पडल्या. यात विशेषतः धावणे,लांब उडी यासारख्या क्रीडा व चित्रकला, चित्रवाचन,रांगोळी काढणे,गाढवाला शेपटी लावणे,स्त्रीच्या कपाळावर बिंदी लावणे या मनोरंजनात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या.* *3 डिसेंबर 2024 रोजी शिर्डी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ दिव्यांगांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना साई दर्शन घडवून आणले.त्याचप्रमाणे विद्यालयात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.यावेळी राहाता ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी मा. तायडे साहेब तसेच आरोग्य निरीक्षक मा.जासूद साहेब व परिचारिका सौ मनीषा कबाडी आणि श्रीमती लोखंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.* *विद्यालयातील विशेष शिक्षक श्री योगेश पाटील सर यांनी दिव्यांगांच्या विविध योजना व कायदेविषयक माहिती दिली. प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ वैशालीताई चौधरी विद्यालय मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.* *सर्व विद्यार्थ्यांना फळ आहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*
0 Comments