श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित  श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय शिर्डी येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा विद्यालय संस्थापक सन्माननीय माधवराव चौधरी सर लोकनियुक्त सरपंच नांदुर्खी बु. यांचे मार्गदर्शना खाली उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यालयातील ध्वजारोहण सन्माननीय विलासराव रोहोम पाटील आडतदार,कृषी उत्पन्न बाजार समिती,राहाता यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या.अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली." हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या माध्यमातून दि. 13, 14, 15 ऑगस्ट या तीनही दिवशी स्वातंत्र्य दिन उत्सवाचे वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते.  महसूल पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत "नशा मुक्त भारत अभियान"  निमित्त नशा मुक्तीची शपथ घेऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले. नशा मुक्त स्वतंत्र भारत हे अभियान यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करावा, नशा मुक्त भारत अभियानात मी स्वतः सहभागी असून  आपण सर्वांनी या अभियानाचे साक्षीदार व्हावे,स्वतः नशा करू नये व आपल्या सभोवतालच्यांना देखील नशा मुक्त होण्यास विनंती करावी असे आवाहन प्रमुख पाहुणे विलासराव रोहोम यांनी केले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विध्यार्थ्यानी आकर्षक डंबेल्स कवायत, तालबद्ध कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.विद्यालयाचे कलाशिक्षक श्री जालिंदर चासकर यांनी 'शुभ दिन आयो रे' या देशभक्तीपर गीतावर मूकबधिर मुलांचे सुंदर समूहनृत्य सादर केले. वर्षभरात विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते कौतुक करण्यात आले. यावेळी सुदामराव गोंदकर, महेंद्र मुर्तडक, प्रकाश  बोधक, चंद्रभान बनकर,राजेंद्र गोंदकर,सुनिल कोल्हे पाटील, विलासराव औताडे,अभिषेक चौधरी,साईप्रिया चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय रजनी भाई तेवर,साईनाथ भाऊ गोंदकर,विनोद विधाते, अनिकेत बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालय मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच सूत्रसंचालन वि. शिक्षक श्री सोळसे बी. बी.तर आभार श्री वहाडणे एम.पी.यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.*