जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद, अहमदनगर,  दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळदघाट व स्पेशल ऑलिम्पिक भारत -महाराष्ट्र शाखा अहमदनगर तसेच जिल्हा क्रीडा विभाग यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित दिव्यांगांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि.29 व 30 डिसेंबर 2023 रोजी विळदघाट, अहमदनगर येथे  पार पडल्या
 श्री साई- श्रद्धा ग्रामीण मुक- बधिर विद्यालय, शिर्डी येथील मुक बधिर विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेऊन अलौकिक यश संपादन केले.

चि.राहुल राजेंद्र धनवटे याने 50 मी धावणे -प्रथम क्रमांक, चि. रोहित हरिदास सोनवणे याने लांब उडी स्पर्धेत -प्रथम क्रमांक, कु. ऋतुजा सचिन चौधरी हिने लांब उडी -द्वितीय क्रमांक, कु. अनुजा सुनिल निळे हिने गोळाफेक स्पर्धेत -तृतीय क्रमांक, चि. सिद्धू सुभाष  वाकचौरे याने लांब उडी स्पर्धेत -तृतीय क्रमांक मिळवला.



  मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल श्री साई अपंग विकास महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.आशाताई दादासाहेब चौधरी, सरचिटणीस-सौ. वैशालीताई माधवराव चौधरी तसेच विद्यालय संस्थापक व नांदुर्खी बु. चे लोकनियुक्त सरपंच श्री माधवराव चौधरी यांनी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.